Musheer Khan cricket comeback story with century and 6-fer मागच्या वर्षी एका भीषण कार अपघातातून वाचल्यानंतर मुशीर खानने रेड-बॉल क्रिकेटमध्ये दणदणीत पुनरागमन केले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने त्यांचा युवा संघ इंग्लंडमध्ये पाठवला आहे. MCA कोल्ट्स विरुद्ध नॉटस् सेकंड इलेव्हन यांच्यातील सामन्यात त्याने अष्टपैलू प्रदर्शन करताना जोरदार पुनरागमन केले. या सामन्यातून मुशीरने शतक ठोकले आणि नंतर सहा विकेट्सही घेतल्या.