Sanju Samson has opened up about leaving Rajasthan Royals ahead of IPL 2026
esakal
Sanju Samson Breaks Silence On RR Exit Before IPL 2026: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. संजूने राजस्थान रॉयल्सची साथ का सोडली? या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेक तर्क लावले गेले. रियान परागला कर्णधार बनवण्यावरून संजू नाराज होता, वैभव सूर्यवंशी संघात आल्याने संजूला सलामीला खेळता येत नव्हते, हेही कारण असल्याचे सांगितलं गेलं. पण, अखेर IPL 2026 च्या तोंडावर संजूने संघ सोडण्यामागचं नेमकं कारण सांगितलं.