पृथ्वी शॉने मुंबई क्रिकेट सोडून 2025-26 हंगामासाठी महाराष्ट्र संघात प्रवेश केला.
MCA A vs MCA B सराव सामन्यात शॉने 45 चेंडूत फक्त 26 धावा केल्या.
कर्णधार ऋतुराज गायकवाडने 34 चेंडूत नाबाद 33 धावा करून आक्रमक खेळी केली.
Maharashtra cricket MCA A vs MCA B 2025 scorecard : भारतीय क्रिकेटचा भविष्याचा स्टार म्हणून नाव चर्चेत असलेल्या पृथ्वी शॉ याची कारकीर्द झपाट्याने कोसळली. त्याच्यामागून आलेले शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल यांनी टीम इंडियातील त्याचे स्थान बळकट केले आहे. अशात पृथ्वी शॉ संघर्ष करतोय. त्याच्या खेळात शिस्तीचा अभाव जाणवतोय आणि त्यामुळेच मुंबई क्रिकेट संघाने त्याला संघाबाहेर बसवले होते. २०२५-२६ चा देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आणि तो महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.