

Glenn Phillips & Rachin Ravindra | T20 World Cup 2026
Sakal
New Zealand to 8-Wicket Win Over Canada: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत न्यूझीलंड संघानेही मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सुपर ८ मधील प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे पहिल्या फेरीतील डी ग्रुपचेही चित्र स्पष्ट झाले आहे. न्यूझीलंडने मंगळवारी कॅनडाला ८ विकेट्सने चेन्नईत झालेल्या सामन्यात पराभूत केले. यासह ४ सामन्यांनंतर ६ गुण मिळवर सुपर ८ मधील प्रवेश मिळवला.
डी ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने पहिले तिन्ही सामने जिंकून आधीच सुपर ८ मध्ये (Super 8) प्रवेश मिळवला होता. आता न्यूझीलंडलही त्यांना सामील झाली असल्याने या ग्रुपमधील इतर तीन संघ अफगाणिस्तान, युएई आणि कॅनडा यांचे आव्हान संपले आहे.