IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

India Lose 5th T20I But Seal Series 3-2 vs New Zealand : न्यूझीलंडने टीम सिफर्ट आणि ग्लेन फिलिप्सच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताला ५ व्या टी२० सामन्यात पराभूत केले. पण भारताने ही मालिका मात्र जिंकली. या सामन्यात फिलिप्सने विश्वविक्रमही केला.
 India vs New Zealand 5th T20I

India vs New Zealand 5th T20I

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 5th T20I: न्यूझीलंड क्रिकेट संघाने रविवारी (१ नोव्हेंबर) भारताविरुद्ध पाचवा आणि अखेरचा टी२० सामना ७ विकेट्सने जिंकत मालिकेचा शेवट गोड केला. मात्र, भारताने ही मालिका पहिल्या तीन विजयांमुळे ३-२ अशा फरकाने जिंकली.

रविवारी न्यूझीलंडच्या विजयात टीम सिफर्ट (Tim Seifert) आणि ऍडम मिलने (Adam Milne) यांनी मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान, ग्लेन फिलिप्सनेही (Glenn Phillips) चांगली खेळी करत केन विलियम्सनचा विक्रम मोडला.

या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग न्यूझीलंडने १८ षटकात ३ विकेट्स गमावत १९५ धावा करत सहज पूर्ण केला. टीम सिफर्ट आणि ग्लेन फिलिप्स यांनी अर्धशतके केली.

 India vs New Zealand 5th T20I
IND vs NZ, 5th T20I: आऊट की सिक्स? इशान किशनचा शॉट अन् ऍलेनची भन्नाट फिल्डिंग, पण थर्ड अंपायरच्या निर्णयावर वाद
Loading content, please wait...