IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंडने पहिल्यांदा भेदला भारताचा अभेद्य किल्ला! इंदोरमध्ये उधळला विजयाचा गुलाल, विराट कोहलीचं शतक व्यर्थ

New Zealand Beat India in ODI Series: न्यूझीलंडने इंदोरमध्ये तिसऱ्या वनडेत भारताला पराभूत करून वनडे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. विराट कोहलीचे शतक व्यर्थ ठरले.
India vs New Zealand 3rd ODI

India vs New Zealand 3rd ODI

Sakal

Updated on

India lost ODI Series against New Zealand: न्यूझीलंडच्या वनडे संघाने रविवारी (१८ जानेवारी) इतिहास घडवला आहे. इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णयाक सामन्यात न्यूझीलंडने भारताला ४१ धावांनी पराभूत केले. त्यामुळे न्यूझीलंडने ही तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

न्यूझीलंडने त्यांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच भारतात वनडे मालिका (ODI Series Victory) जिंकली आहे. १९८९ पासून न्यूझीलंड भारतात वनडे मालिका खेळत होते, मात्र त्यांना यापूर्वी कधीही मालिका जिंकता आली नव्हती. तसेच भारताने २०१९ नंतर पहिल्यांदाच वनडे मालिका मायदेशात गमावली आहे.

न्यूझीलंडने (New Zealand Cricket Team) भारतासमोर विजयासाठी ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ ४६ षटकात सर्वाबाद २९६ धावाच करता आल्या. विराट कोहलीचे शतक (Virat Kohli) आणि हर्षित राणा व नितीश कुमार रेड्डी यांची अर्धशतकं व्यर्थ ठरली.

<div class="paragraphs"><p>India vs New Zealand 3rd ODI</p></div>
IND vs NZ 3rd ODI: 'चेस मास्टर' विराट कोहली लढला अन् विश्वविक्रमी सेंच्युरीही ठोकली; मालिका विजयासाठी भारताच्या आशा जिवंत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com