
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यातील टी२० मालिकेला रविवारपासून (१६ मार्च) सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडने ५९ चेंडू आणि ९ विकेट्स राखून विजय मिळवला.