IND vs NZ : न्यूझीलंडने 'वर्ल्ड रेकॉर्ड' होल्डर फलंदाज बोलावला, अभिषेक शर्माला देणार टक्कर; शेवटच्या २ सामन्यांसाठी संघ बदलला

IND vs NZ T20 series New Zealand squad update: मालिकेत ०-३ अशा पिछाडीवर असलेल्या न्यूझीलंड संघाने मोठा डाव टाकलला आहे. भारतीय संघाकडून वादळी फलंदाजी करणाऱ्या अभिषेक शर्माला टक्कर देण्यासाठी ‘वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर’ फलंदाजाला संघात सामील करण्यात आले आहे.
New Zealand brings Finn Allen to counter Abhishek Sharma

New Zealand brings Finn Allen to counter Abhishek Sharma

esakal

Updated on

New Zealand squad changes for India tour T20I : न्यूझीलंडने त्यांच्या ट्वेंटी-२० संघात बदल केले आहेत. भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड ०-३ असा पिछाडीवर आहे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी हा पराभव न्यूझीलंडची चिंता वाढवणारा आहे. भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या फटकेबाजीसमोर पाहुण्यांचे गोलंदाज अपयशी ठरलेले दिसत आहेत. त्यामुळेच त्यांनी उर्वरित दोन सामन्यांसाठी संघात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिषेकला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी किवींनी बिग बॅश लीग गाजवणाऱ्या फलंदाजाला संघात बोलावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com