T20 World Cup स्पर्धेसाठी संधी न मिळताच स्फोटक फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती; अनेक विक्रम आहेत नावावर

Colin Munro Retirement: टी20 वर्ल्ड कपसाठी राष्ट्रीय संघात संधी न मिळाल्यानंतर 37 वर्षीय स्फोटक फलंदाज कॉलिन मुनरोने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Colin Munro | New Zealand Cricketer
Colin Munro | New Zealand CricketerX/BLACKCAPS

Colin Munro Retirement: जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी न्यूझीलंडने काही दिवसांपूर्वीच संघाची घोषणा केली आहे. मात्र, या संघात संधी न मिळल्यानंतर 37 वर्षीय फलंदाज कॉलिन मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

मुनरोला टी20 वर्ल्ड कपसाठी राष्ट्रीय संघात निवड होईल अशी अपेक्षा होती. मात्र, तो संघात स्थान मिळवण्यात थोडक्यात चूकला. यानंतर आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुनरोने 2014 आणि 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. तो 2019 वनडे वर्ल्ड कपसाठीही न्यूझीलंड संघाचा भाग होता.

दरम्यान, मुनरोने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली, तरी तो जगभरातील टी20 लीग स्पर्धांमध्ये खेळत राहणार आहे.

Colin Munro | New Zealand Cricketer
Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

मुनरोने निवृत्ती घेताना सांगितले की 'न्यूझीलंडसाठी खेळणे नेहमीच माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश असेल. न्यूझीलंडची जर्सी घालताना मला अभिमान वाटला आहे आणि मी 123 वेळा ही जर्सी घालू शकलो, ज्याचा मला अत्यंत अभिमान आहे.'

'मी शेवटचं न्यूझीलंडकडून खेळलो, त्याला बराच वेळ झाला असला, तरी मी आशा सोडल्या नव्हती की मी माझ्या टी20 फ्रँचायझी फॉर्ममुळे पुनरागमन करेल. मात्र, टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा झाल्यानंतर अधिकृतरित्या थांबण्याची वेळ आली आहे.'

मुनरो न्यूझीलंडकडून अखेरीस 2020 मध्ये भारताविरुद्ध टी20 सामना खेळला आहे. तो न्यूझीलंडचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सहाव्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तीन शतके केली आहेत. विशेष म्हणजे तो या क्रिकेट प्रकारात तीन शतके करणारा सर्वात पहिला क्रिकेटपटू आहे.

Colin Munro | New Zealand Cricketer
Neeraj Chopra: ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा, किशोर जेनाची दोहा डायमंड लीगमध्ये परीक्षा, कधी अन् कुठे पाहणार स्पर्धा?

त्याने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 47 चेंडूत शतक केले होते. हे त्यावेळी न्यूझीलंडकडून केलेलं सर्वात जलद शतक होते. त्याचबरोबर 2016 साली श्रीलंकेविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले होते. हे आंतरराष्ट्रीय टी20 मधील न्यूझीलंडकडून केलंल सर्वात जलद अर्धशतक आहे. हा विक्रम आजही त्याच्या नावावर आहे.

मुनरोने 2006 मध्ये 19 वर्षांखालील टी20 वर्ल्ड कपमध्येही खेळला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2012-13 सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून पदार्पण केले होते.

मुनरोने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत एकच कसोटी सामना खेळला. मात्र मर्यादीत षटकांमधील त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली. त्याने 57 वनडेत 8 अर्धशतकांसह 1271 धावा केल्या, तर आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 65 सामन्यांत 3 शतके आणि 11 अर्धशतकांसह 1724 धावा केल्या. त्याचबरोबर त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 विकेट्सही आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com