Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

Virat Kohli PBKS vs RCB
Virat Kohli PBKS vs RCBesakal

Virat Kohli Catch Dropped Twice PBKS vs RCB : पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम आरसीबीला फलंदाजीसाठी पाचारण केलं. आऱसीबीने देखील पहिल्या 10 षटकात दमदार फलंदाजी करत 3 बाद 119 धावांपर्यंत मजल मारली. रजत पाटीदारने 23 चेंडूत 55 धावांची आक्रमक खेळी केली तर विराट कोहलीने देखील 42 धावा ठोकल्या होत्या. मात्र आरसीबीच्या या फलंदाजांना पंजाबच्या क्षेत्ररक्षकांनी एक नाही दोन नाही तर तब्बल तीनवेळा जीवनदान दिलं.

Virat Kohli PBKS vs RCB
KL Rahul LSG Captaincy : केएल राहुल त्वरित सोडणार लखनौची कॅप्टन्सी? LSG मध्ये जोरदार हालचाली

पॉवर प्लेमध्ये विधवत कवेराप्पाच्या गोलंदाजीवर विराट कोहलीला शुन्यावर जीवनदान मिळालं. आशुतोष सिंहने त्याचा झेल सोडला. त्यानंतर कवेराप्पाच्याच दुसऱ्या षटकात विराट कोहलीला 10 धावांवर असताना अजून एक जीवनदान मिळालं. रिली रूसोने शॉर्ट कव्हर्सवर डाईव्ह मारून झेल पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला अपयश आलं. त्यानंतर कवेराप्पा सामन्याचं पाचवं षटक टाकण्यासाठी आला.

त्यावेळी रजत पाटीदार स्ट्राईकवर होता. त्यानं अजून खातं देखील उघडलं नव्हतं. कवेराप्पाच्या गोलंदाजीवर डीप कॅक्वर्ड स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या हर्षल पटेलने साधा झेल सोडला. अन् पाटीदारनं पंजाब किंग्जच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. रजत पाटीदारनं 21 चेंडूत अर्धशतक ठोकत आरसीबीला 10 षटकाच्या आतच शतकी मजल मारून दिली.

Virat Kohli PBKS vs RCB
Sanjiv Goenka: आठ वर्षांपूर्वी धोनीबरोबर संजीव गोयंकांनी जे केलं, तेच केएल राहुलसोबतही होणार?

विराट कोहली आणि रजत पाटीदार या दोघांनही या जीवनदानाचा चांगलाच फायदा उचलला. रजतनंतर विराट कोहलीने देखील आपले अर्धशतक पूर्ण केलं. पावसाच्या व्यत्यायामुळं सामना थांबला होता. मात्र सामना सुरू झाल्यावर विराटनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं आरसीबीला 15 षटकात 164 धावांवर पोहचवलं. कॅमरून ग्रीन मात्र 15 चेंडूत 19 धावा करत संथ खेळत होता.

(IPL 2024 Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com