

Glenn Phillips Flaunts Pilot Skills
Sakal
न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) म्हटलं की सर्वांना त्याची अफलातून झेल आठवतात. अनेकदा त्याच्याकडे पाहिलं की तो काय करू शकत नाही, असा प्रश्नही अनेकांना पडतो, कारण तो एक उत्तम स्फोटक फलंदाज आहे, तो गोलंदाजीही करतो. तो यष्टिरक्षकही आहे. इतकेच नाही, तर तो एक उत्तम क्षेत्ररक्षक आहे.
मैदानात जेव्हा तो क्षेत्ररक्षण करतो, तेव्हा सहसा त्याच्या हातून चेंडू सुटत नाही. त्याने अनेकदा हवेत सूर मारत अविश्वसनीय झेलही घेतो. त्याने काही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्वही केले आहे. त्यामुळे त्याला एक खरा अष्टपैलू अशीही ओळख मिळाली आहे, पण हे इतक्यावरच थांबत नाही, तर तो चक्क विमानही उडवू शकतो. त्याने स्वत: व्हिडिओ (Video) शेअर करत हे सिद्ध केलं आहे.