
न्यूझीलंड क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तान संघाला टी२० मालिकेत ४-१ अशा फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर आता बुधवारी (२ एप्रिल) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार आता गोलंदाजी यादीत अव्वल क्रमांकावर नव्या गोलंदाजाला स्थान मिळाले आहे.
न्यूझीलंडच्या ३० वर्षीय जेकॉब डफीने आयसीसी टी२० क्रमवारी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने पहिल्यांदाच कोणत्याही प्रकारातील क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या अकिल हुसेनला मागे टाकून हे पहिल्या क्रमांकाचे सिंहासन पटकावले आहे.