
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तानला टी२० मालिकेत ४-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांना वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.
नेपियरला शनिवारी (२९ मार्च) झालेल्या पहिल्या वनडेत न्यूझीलंडने पाकिस्तानला ७३ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण या सामन्यात पाकिस्तानकडून एक चूक झाली. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्यांच्यावर कारवाई केली आहे.