New Zealand opener Finn Allen may miss the start of the India T20I series due to Big Bash League commitments
esakal
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमानांनी विजय मिळवला. आता उर्वरित चार सामन्यात पुनरागमन करण्याचे आफ्रिकेचे लक्ष्य आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी तयारीसाठी भारताच्या वाट्याला फार कमी ट्वेंटी-२० सामने येत आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर सूर्यकुमार यादवच्या संघाला पुढील वर्षाच्या सुरुवातीला ५ सामन्यांची मालिका खेळायची आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका घरच्या मैदानावरच होणार आहे, परंतु त्याआधी किवींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे.