
न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तानला शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात ५ विकेट्सने पराभूत केले. पाकिस्तानध्ये खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडची कामगिरी शानदार राहिली.
अंतिम सामन्यात देखील न्यूझीलंडने पाकिस्तानकडून मिळालेलं २४३ धावांचे लक्ष्य ४५.२ षटकातच ५ विकेट्स गमावत पूर्ण केलं. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल (५७), टॉम लॅथम (५६) आणि डेवॉन कॉनवे (४८) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.