T20 World Cup Final India vs New Zealand Marathi News
esakal
India vs New Zealand T20 World Cup Final Marathi Update News : भारताचा हा ट्वेंटी-२० संघ, हा सध्याच्या घडीतील GOAT आहे.. या संघाने ऑगस्ट २०२३ नंतर एकही मालिका किंवा स्पर्धा गमावलेली नाही... मागील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून सुरू झालेली अपराजित मालिका या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने खंडित केली. पण, त्यानंतर टीम इंडियाने पुन्हा विजयी लय पकडली आणि आता फायनलमध्ये धडक दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे. किवींनी आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला नेहमी कडवी टक्कर दिली आहे आणि त्यामुले आजच्या सामन्यात चुरस पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे.