Who is Nic Maddinson? कॅन्सरवर मात अन् ९ वर्ष २८३ दिवसांनी पुनरागमन! ऑस्ट्रेलियन ओपनरच्या जिद्दीची कहाणी, पण...

SA vs AUS 1st Test Who is Nic Maddinson ? ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर निक मॅडिन्सन याची कहाणी केवळ क्रिकेटमधील पुनरागमनाची नाही, तर जीवघेण्या आजाराविरुद्ध दिलेल्या लढ्याचीही आहे.
South Africa vs Australia 1st Test

Who is Nic Maddinson Australian cricketer

esakal

Updated on: 

Nic Maddinson cancer diagnosis and chemotherapy journey: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डर्बन येथे पहिला कसोटी सामना सुरू आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ समोरासमोर आल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, परंतु यजमान आफ्रिकेचा सामना पाहण्यासाठी डर्बन स्टेडियमवर पाखरूही फिरकले नाही. रिकाम्या स्टेडियममध्ये हा सामना सुरू होता, पण या सामन्यात एका खेळाडूच्या पुनरागमनाची सर्वाधिक चर्चा राहिली. कॅन्सरवर मात करून तो जवळपास १० वर्षांनी क्रिकेटमध्ये परतला होता. सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या निक मॅडिन्सनने परतीच्या सामन्यात मात्र नकोसा विक्रम नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com