

Nicholas Pooran MLC 31 Ball Century
Sakal
MLC 2026 Cricket News: सध्या विविध देशांमध्ये टी२० फ्रँचायझी क्रिकेट खेळले जाते. सध्या अमेरिकेतही मेजर लीग क्रिकेट २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात वॉशिंग्टन फ्रिडमने मोठा विजय मिळवत स्पर्धेत पुढचे पाऊल टाकले. मात्र असे असले तरी एमएआय न्यूयॉर्ककडून निकोलस पूरनने केलेल्या शतकाने सर्वांचेच लक्ष वेधले. एमएआय न्यूयॉर्क ही मुंबई इंडियन्समधील सिस्टर फ्रँचायझी आहे. पूरनने ३१ चेंडूतच शतक ठोकले होते.