
lowest Men's T20I total : नायजेरियाच्या संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आफ्रिका उप खंडीय पात्रता स्पर्धेतील सामन्यात आयव्हरी कोस्टावर २६४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला. नायजेरियाच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धींना अवघ्या ७ धावांत गुंडाळले आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी सिंगापूर संघाने याचवर्षी सप्टेंबरमध्ये मंगोलियाचा संपूर्ण संघ १० धावांत तंबूत पाठवला होता.