Nitish Kumar Reddy first-over hattrick in SMAT 2025
esakal
Nitish Kumar Reddy picked up a hattrick in the SMAT : भारताच्या ट्वेंटी-२० संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या नितीश कुमार रेड्डीने सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-२० ट्रॉफीत हॅटट्रिक घेतली. आंध्र प्रदेशकडून खेळणाऱ्या अष्टपैलू खेळाडूने त्याच्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली. त्याने मध्य प्रदेशच्या डावातील तिसऱ्या षटकात हर्ष गवळी, हरप्रीत सिंग भाटीया आणि रजत पाटीदार यांना बाद केले. नितीशच्या या कामगिरीमुळे आंध्र प्रदेशच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांचा संपूर्ण संघ ११२ धावांवर तंबूत परतला आणि मध्य प्रदेशला १४ धावात ३ धक्के दिले होते. पण, आंध्र प्रदेशला हार मानावी लागली.