
Australia vs India Boxing Day Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळत असून हा बॉक्सिंग डेला (२६ डिसेंबर) सामना सुरू झाला आहे.
या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करताना अडचणीत आली होती परंतु, भारताला २१ वर्षीय नितीश कुमार रेड्डीने या संकटातून बाहेर काढले आहे. त्याने या सामन्यात दमदार शतकही केले आहे.