
Nitish Kumar Reddy's Father Sacrificed his job: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी २१ वर्षांच्या नितीश कुमार रेड्डीने गाजवली आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसानंतरही जरी ऑस्ट्रेलिया आघाडीवर असले, तरी नितीशने त्याचं नाणं या सामन्यात खणखणीत वाजवलं.
आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत त्याने शतक केले. त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारीही केली. पण त्याच्या शतकासोबतच चर्चा झाली त्याच्या वडिलांचीही. त्याचे वडीलही मेलबर्नमध्ये त्याने शतक केले, तेव्हा स्टेडियममध्ये उपस्थित होते.