
Delhi vs Uttar Pradesh, Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत दिल्ली आणि उत्तर प्रदेश संघ आमने-सामने होते. हा सामना बंगळुरूमध्ये होत असून दिल्लीने हा सामना १९ धावांनी जिंकला. दरम्यान, या सामन्यात एक नाट्यमय घटना पाहायला मिळाली.
या सामन्यात दिल्लीचा माजी खेळाडू आणि सध्या उत्तर प्रदेशकडून खेळणारा नितीश राणा आणि दिल्लीचा विद्यमान कर्णधार आयुष बडोनी एकमेकांना भिडल्याचे दिसले.