Pakistan’s former cricketer Sana Mir has sparked controversy after her ‘Azad Kashmir’ remark
esakal
Sana Mir Azad Kashmir World Cup controversy: पाकिस्तानी क्रिकेटपटू काही सुधारण्याचं नाव घेत नाहीएत. आशिया चषक २०२५ स्पर्धेत वादग्रस्त विधान अन् हावभावाची मालिका सुरू ठेवल्यानंतर आता माजी महिला क्रिकेटपटू वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बरळताना दिसत आहेत. भारतात महिलांचा वन डे वर्ल्ड कप सुरू आङे आणि पाकिस्तानची माजी कर्णधार व समालोचक सना मीर हिने वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या सामन्याचे समालोचन करताना सनाने 'आजाद काश्मीर' असे वक्तव्य केले.