
बीसीसीआयने श्रेयस अय्यरला वन डे कर्णधार म्हणून विचारात घेतल्याची बातमी फेटाळली.
सचिव देवजित सैकिया यांनी ‘अशी कोणतीच चर्चा सुरू नाही’ असे स्पष्ट केले.
शुभमन गिलची वन डे सरासरी ५९ असून तो सध्या संघाचा उपकर्णधार आहे.
Shubman Gill In Line All-Format Captain : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) अखेर टीम इंडियाच्या वन डे संघाचा भविष्याचा कर्णधार कोण असेल, यावर मौन सोडले आहे. रोहित शर्मा सध्या वन डे संघाचा कर्णधार आहे आणि तो आता ३८ वर्षांचा आहे. त्यामुळे बीसीसीआयने २०२७ चा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील कर्णधाराचा शोध सुरू केला आहे. या शर्यतीत श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. पण, BCCI ने या वृत्ताचे खंडन केले आहे.