T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

India Pakistan final possibility after Super 8: T20 World Cup 2026 स्पर्धेत इंग्लंडच्या विजयामुळे उपांत्य फेरीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे. या निकालानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीत सामना होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. क्रिकेट चाहत्यांना अपेक्षित असलेला आणखी एक हायव्होल्टेज ‘India vs Pakistan’ थरार आता पाहायला मिळणार नाही.
Why India vs Pakistan semifinal not possible T20 World Cup 2026

Why India vs Pakistan semifinal not possible T20 World Cup 2026

esakal

Updated on

England’s Victory Ends Hopes of India-Pakistan Semifinal Clash: भारत आणि पाकिस्तान यांच्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीचा सामना आता होणे शक्य नाही. इंग्लंडने काल सुपर ८च्या लढतीत पाकिस्तानला पराभूत करून ग्रुप २ मधून उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. हॅरी ब्रूकच्या शतकाने इंग्लंडला सुपर ८ मधील सलग दुसरा विजय मिळवून दिला आणि ४ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचणारा तो पहिला संघ ठरला. आता ग्रुप २ मधून पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एका स्थानासाठी चुरस रंगणार आहे. पण, चाहत्यांना ज्या सामन्याची म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान उत्सुकता होती, तो सामना आता होणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com