

No IPL 2026 opening ceremony! BCCI opts to honour victims of Bengaluru stampede
esakal
IPL 2026 latest updates opening ceremony cancelled news : इंडियन प्रीमिअर लीगच्या १९व्या पर्वाला २८ मार्चपासून सुरूवात होत आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू जेतेपदाचा बचाव करण्यासाठी सनरायझर्स हैदराबादचा सामना करणार आहे आणि बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी उद्घाटन सोहळा अपेक्षित होता, परंतु BCCI ने यंदा असा सोहळा करणार नसल्याचे जाहीर केले. RCB चा संघ जेव्हा चिन्नास्वामी स्टेडियमवर उतरेल, तेव्हा त्यांच्यासमोर जेतेपदाच्या जल्लोषासह एक वेदनादायी गोष्टही उभी राहिल... आणि त्याच घटनेमुळे यंदाचा उद्घाटन सोहळा होणार नाही.