इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधून माघार घेतल्यानंतर हॅरी ब्रूकवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई BCCI कडून करण्यात आली. पण, त्याला त्याच्या निर्णयाचा नक्कीच आता पश्चाताप होणार नाही. युवा फलंदाज हॅरी ब्रूक याला इंग्लंडने वन डे व ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनवले आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB) सोमवारी ही घोषणा केली. हॅरी ब्रूक सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून आयपीएल खेळला होता, परंतु मालकीण काव्या मारनने त्याला संघातून रिलीज केले. आयपीएल लिलावात ६.२५ कोटींत त्याला दिल्ली कॅपिटल्सने आपल्या ताफ्यात घेतले होते, परंतु स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी त्याने वैयक्तिक कारण सांगत माघार घेतली.