Irfan Pathan’s predicted India XI for the 1st T20I against Australia
esakal
Irfan Pathan picks India playing XI for 1st T20I vs Australia : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. इरफानने त्याच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) बाहेर ठेवून वरुण चक्रवर्थीला पसंती दर्शवली आहे. कुलदीपकडे गुणवत्ता असूनही त्याला पुरेशी संधी दिली जात नसल्याची खंत अनेकदा व्यक्त केली जात आहे. इरफाननेही वन डे संघात पुरेशी संधी न मिळण्यावरून अनेकदा टीका केली आहे. पण, उद्या होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यासाठीच्या त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधूनच कुलदीप गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.