DY Patil Stadium WPL matches municipal election impact
esakal
नवी मुंबई, ता. १२ : शहरात होत असलेल्या महापालिका निवडणुकीमुळे डी. वाय. पाटील स्टेडियमवरवर सुरू असलेल्या महिला प्रीमिअर लीग मधील सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहे. १४, १५ आणि १६ तारखेच्या सामन्यांसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसेल. डी. वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने विश्वकरंडक जिंकल्यामुळे या स्टेडियमवरील महिलांच्या सामन्यांना कमालीचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मुळे महिला प्रीमियर लीगमधील पहिल्या टप्प्याचे सामने येथे खेळवण्यात येत आहेत.