

Kavya Maran, Sunrisers Leeds
Sakal
इंडियन प्रीमियर लीगमधील विजेत्या संघांपैकी एक संघ सनरायझर्स हैदराबाद संघही आहे. आयपीएलमध्ये आपली वेगळी छाप पाडलेल्या या फ्रँचायझीच्या वेगवेगळ्या देशात सिस्टर फ्रँचायझीही आहेत.
आता इंग्लंडमध्येही सनरायझर्स हैदराबादची आणखी एक सिस्टर फ्रँचायझी असलेल्या संघाचे नाव बदलण्यात आले आहे. द हंड्रेड या स्पर्धेतील नॉर्दन सुपरचार्जेसचे नाव सोमवारी बदलण्यात आले आहे. द सन ग्रुपने यॉर्कशायरमधील या फ्रँचायझीचे १०० टक्के हिस्सा फेब्रुवारी २०२५ मध्ये खरेदी केला होता.