PSL’s IPL Copycat Attempt Backfires as Hyderabad Franchise Sold at Throwaway Price
esakal
Pakistan Super League auction vs IPL comparison: पाकिस्तान सुपर लीग या ट्वेंटी-२० फ्रँचायझी स्पर्धेत दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला. आतापर्यंत सहा संघ या लीगमध्ये खेळत होते आणि यावर्षापासून दोन नवीन संघांचा समावेश झाला आहे. रिअल इस्टेट कन्सोर्टियम आणि अमेरिकेतील एव्हिएशन व हेल्थकेअर कंपनींनी गुरुवारी पीएसएलमध्ये दोन नवीन ट्वेंटी-२० फ्रँचायझींसाठी अंदाजे ११४ कोटी रुपयांमध्ये बोली जिंकली. ओझेड डेव्हलपर्सने सियालकोटला असे नवीन फ्रँचायझीला नाव दिले गेले आणि त्यासाठी त्यांनी लिलावात ५८.३८ कोटी भारतीय रुपयांची यशस्वी बोली लावली. अमेरिकेतील एफकेएस ग्रुपने हैदराबाद फ्रँचायझीसाठी ५५.५७ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली.