

IPL 2026 playoffs prediction by former India cricketer Aakash Chopra.jpg
esakal
IPL 2026 top four teams expert prediction: इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व २८ मार्चपासून सुरू होत आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या सलामीच्या लढतीने आयपीएल २०२६ला सुरूवात होईल. काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने बीसीसीआयने आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांचेच वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे उर्वरित वेळापत्रक कधी येईल, याची सर्वांना उत्सुका आहे. आयपीएल म्हटलं की भारतीय चाहते आपापल्या आवडच्या खेळाडूसाठी विभागले जातात आणि मग चर्चा सुरू होते, ती तुझा खेळाडू बेस्ट की माझा.. तुझा संघ बेस्ट की माझा अन् मग प्ले ऑफमध्ये कोण बाजी मारेल? अशा या चर्चा भारताच्या माजी खेळाडूंनाही करायला आवडतात आणि अशाच एका खेळाडूने प्ले ऑफमध्ये कोणते चार संघ पोहोचतील, याची भविष्यवाणीच करून टाकली.x