Team India: सूर्याचेच नाही, तर शुभमन गिलचेही वन डे कर्णधारपद जाणार; २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत 'हा' खेळाडू कॅप्टन दिसणार

Shubman Gill may lose ODI captaincy before World Cup 2027: भारतीय क्रिकेट संघाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. सध्याचा युवा स्टार शुभमन गिल याच्याकडून वन डे संघाचे नेतृत्व काढून घेतले जाऊ शकते, असा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे.
Shubman Gill may lose ODI captaincy before World Cup 2027

Shubman Gill may lose ODI captaincy before World Cup 2027

esakal

Updated on

Team India captaincy changes ahead of ODI World Cup: रोहित शर्माने कसोटी आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, गेल्या काही काळात भारताच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदात मोठे बदल झाले आहेत. सूर्यकुमार यादवची ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली, तर शुभमन गिलकडे वन डे आणि कसोटी संघाची सूत्रे सोपवण्यात आली. आता, सूर्यकुमारला त्याच्या पदावरून हटवून कर्णधारपदाची सूत्रे श्रेयस अय्यरकडे ( Shreyas Iyer New Captain) सोपवली जाऊ शकतात, असे वृत्त समोर आले आहे. असे असताना शुभमनकडूनही वन डे संघाचे नेतृत्व जाण्याची चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com