vaibhav sooryavanshi च नाही, तर भारताच्या बाकी फलंदाजांनीही श्रीलंकन गोलंदाजांना झोडलं अन् उभं केलं डोंगराएवढं लक्ष्य

India A vs Sri Lanka A: भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील त्रिदेशीय मालिकेच्या अंतिम सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अवघ्या 29 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य उभे केले.
vaibhav sooryavanshi

vaibhav sooryavanshi

esakal

Updated on

India A vs Sri Lanka A: भारताचा अ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून, भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील त्रिदेशीय मालिकेचा अंतिम सामना आज रंगत आहे. दाम्बुला येथील रंगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात श्रीलंका 'अ' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत श्रीलंकन गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि धावांचा डोंगर उभा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com