
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा संपून एकच महिना झालेला असताना आता २०२६ मध्ये होणार्या स्पर्धेबद्दल चर्चाही सुरू झाल्या आहेत. आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स शेवटच्या क्रमांकावर राहिला होता. चेन्नईला पहिल्यांदाच शेवटच्या क्रमांकावर रहावे लागले.
त्यामुळे चेन्नई संघाने हंगामाच्या अखेरीसच पुढच्या हंगामाची (IPL 2026) तयारी सुरू केली होती. यातच काही दिवसांपूर्वी अशी बातमी समोर आली की चेन्नई सुपर किंग्स संघ राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला ट्रेडमध्ये आपल्या संघात घेण्यास उत्सुक आहे.