NZ vs AUS 3rd T20I: १५७ धावांचे लक्ष्य, पठ्ठ्याने एकट्याने चोपल्या १०३ धावा! कॅप्टन असावा तर असा, आता सूर्याच्या संघाला भिडणार...

Australia chase 157 with Marsh 103 not out: न्यूझीलंडविरुद्धच्या तिसरा ट्वेंटी-२० सामना ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने एकहाती जिंकून दाखवला. १५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल मार्शने तुफानी खेळी साकारत नाबाद १०३ धावा फक्त ५२ चेंडूत ठोकल्या.
Mitchell Marsh celebrates his unbeaten 103* in Australia’s successful chase against New Zealand

Mitchell Marsh celebrates his unbeaten 103* in Australia’s successful chase against New Zealand

esakal

Updated on

NZ vs AUS 3rd T20I Mitchell Marsh match-winning knock: ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत ३ विकेट्स राखून पराभव करताना तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. न्यूझीलंडच्या ९ बाद १५६ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने धडाधड विकेट गमावल्या, परंतु कर्णधार व सलामीवीर मिचेल मार्श मैदानावर उभा राहिला आणि त्याने १०३ धावांची नाबाद खेळी करून संघाला १२ चेंडू राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला पुढील ट्वेंटी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियाचा सामना करायचा आहे आणि तोही घरच्या प्रेक्षकांसमोर.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com