IND vs NZ 1st ODI Live : अर्शदीप सिंगशी जो नडला, त्याला त्याने...! न्यूझीलंडच्या फलंदाजांची दैना, भारताचे वर्चस्व Video Viral

India vs New Zealand 1st ODI Marathi Cricket News : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या भेदक गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे.
India vs New Zealand 1st ODI

Arshdeep Singh celebrates after dismissing Will Young and Henry Nicholls in the first ODI against New Zealand.

esakal

Updated on: 

New Zealand vs India 1st ODI Marathi Live Score : भारतीय संघाने पहिल्या १० षटकांत काही चुका केल्या... झेल सोडले, रन आऊटच्या सोप्या संधी गमावल्या, पण अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) ने सामन्याला कलाटणी दिली. न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्याने अचंबित करणारे वैविध्यपूर्ण चेंडू टाकले आणि विल यंग व हेन्री निकोल्स यांच्यासारखे फलंदाज फसले. अर्शदीपच्या दोन विकेट्सने सामन्यात भारताला पकड मिळवून दिली आहे. न्यूझीलंडने पहिल्या १० षटकांत २ बाद ४५ धावाच केल्या.

Loading content, please wait...