Arshdeep Singh equals Bhuvneshwar Kumar's Indian T20I record
esakal
India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket News: अर्शदीप सिंग व भुवनेश्वर कुमार यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. भारत-न्यूझीलंड दुसऱ्या ट्वेंटी-२०त पॉवर प्लेमध्ये भारताचे वर्चस्व पाहायला मिळतेय. हा सामना भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरला. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताचा हा ३०० वा सामना आहे. पाकिस्ताननंतर ३०० टी२० सामने खेळणारा भारत हा जगातील दुसरा संघ ठरला.