IND vs NZ 2nd T20I Live: वैभव सूर्यवंशीची एन्ट्री, कोणत्या क्रमांकावर खेळणार? भारताच्या Playing XI मध्ये 2 बदल, टॉस जिंकला अन्..

India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket News: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची अखेर एन्ट्री झाली आहे. क्राइस्टचर्चमधील हेगली ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Vaibhav Sooryavanshi Set To Bat At No. 3

Vaibhav Sooryavanshi Set To Bat At No. 3

Updated on: 

India vs New Zealand 2nd T20I Marathi Cricket News: इशान किशन दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे भारत-न्यूझीलंड दुसऱ्या ट्वेंटी-२०त वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Sooryavanshi) संधी मिळणे अपेक्षित होते. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने श्रेयस अय्यरच्या संघाचे मनोबल उंचावले आहेत, परंतु गोलंदाजी विभागातील निराशाजनक कामगिरी सुधारण्यावर संघाला भर द्यावी लागणार आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय गोलंदाज विभाग फार काही चांगली कामगिरी करताना दिसत नाही. आज सर्व लक्ष गोलंदाजांवर असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com