West Indies defended the lowest-ever T20I total at Eden Park to beat New Zealand by 7 runs
esakal
NZ vs WI 2025 T20I match highlights and scorecard : वेस्ट इंडिजने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात रोमहर्षक विजयाची नोंद केली. १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान न्यूझीलंडने ७० धावांवर तिसरी विकेट गमावली अन् त्यानंतर पुढील ३७ धावांत ६ विकेट्स पडल्या. कर्णधार मिचेल सँटनरने ( Mitchell Santner ) नाबाद अर्धशतकीय खेळी करून सामन्यात चुरस निर्माण केली होती, परंतु किवींना ७ धावांनी हार पत्करावी लागली. इडन पार्कवर ट्वेंटी-२०तील हा सर्वात कमी धावांचा विजय ठरला.