NZ vs WI 1st Test: एका दिवसाचा खेळ शिल्लक, विंडीजल्या हव्यात ३१९ धावा, तर न्यूझीलंडला ६ विकेट्स; क्लासिक कसोटी...

Shai Hope unbeaten 116* sets up thrilling Day 5 finish : पहिल्या कसोटीत रोमांचक परिस्थिती निर्माण झाली आहे. एका दिवसाचा खेळ शिल्लक असून, सामन्याचा निकाल कोणत्याही दिशेने झुकू शकतो. वेस्ट इंडिजलाआणखी ३१९ धावा करायच्या आहेत, तर न्यूझीलंडला विजयासाठी फक्त ६ विकेट्स हव्या आहेत.
Shai Hope’s unbeaten 116 keeps West Indies alive

Shai Hope’s unbeaten 116 keeps West Indies alive

esakal

Updated on

How West Indies fought back on Day 4 vs New Zealand : न्यूझीलंड-वेस्ट इंडिज यांच्यातली कसोटी मालिका रोमांचक वळणावर आली आहे. कर्णधार टॉम लॅथम आणि रचीन रवींद्र यांच्या शतकी खेळीने किवींना फ्रंटसीटवर बसवले. ५३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संघ अडखळला, परंतु शे होपच्या ( Shai Hope ) शतकाने त्यांना आशेचा किरण दाखवला आहे. त्यामुळेच कसोटीच्या पाचव्या दिवसाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विंडीजला विजयासाठी आणखी ३१९ धावा करायच्या आहेत, तर किवींना ६ विकेट्सची गरज आहे. आता विंडीजच्या सर्व 'होप' आक्रमक फलंदाजावर आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com