

Ollie Robinson and Josh Tongue | England vs Pakistan
Sakal
ENGLAND vs PAKISTAN, Test viral video: इंग्लंड आणि पाकिस्तान संघात कसोटी मालिकेला बुधवारी (१९ ऑगस्ट) सुरुवात झाली असून पहिला सामना लीड्सला खेळला जात आहे. पण या सामन्याच्या पहिल्याच दिवसानंतर एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली.
इंग्लंडचे गोलंदाज ऑली रॉबिन्सन (Ollie Robinson) आणि जोश टंग (Josh Tongue) यांनी चक्क चेंडूचे दोन तुकडे (Split Match Ball) केले होते. त्यामागचं कारणही त्यांनी सांगितलं असून त्याचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने शेअर केला आहे.