Tim Seifert Melbourne Renegades BBL hundred
esakal
Tim Seifert Melbourne Renegades BBL hundred : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावात ३५० खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत आणि त्यापैकी ७७ खेळाडूंचे नशीब चमकणार आहे. म्हणूनच लिलावापूर्वी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याचा खेळाडूंचा प्रयत्न सुरू आहे. या लिलावासाठी न्यूझीलंडचा यष्टिरक्षक-फलंदाज टीम सेईफर्ट यानेही नाव नोंदवले आहे आणि तो १.५० कोटींच्या मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये आहे. अबु धाबी येथे मंगळवारी लिलाव पार पडणार आहे आणि त्यापूर्वी सोमवारी टीम सेईफर्टने वादळी शतक झळकावून फ्रँचायझींचे लक्ष वेधले आहे.