On This Day: इंग्लंडची हालत खराब करणारा फिरकीची जादूगार 'अब्दुल कादिर', १६ कसोटीतच घेतल्या तब्बल ८२ विकेट्स

Abdul Qadir born on 15th September 1955: सत्तर-ऐंशीच्या दशकात इंग्लंड संघाला अब्दुल कादिर यांच्या फिरकीने चांगलेच सतावले होते. त्यांची इंग्लंडविरुद्ध नेहमीच कामगिरी बहरली होती.
Abdul Qadir Khan
Abdul Qadir KhanSakal
Updated on

Know About Abdul Qadir: क्रिकेटच्या इतिहासात अनेक खेळाडू असे राहिले आहेत, ज्यांची फार चर्चा होत नाही, मात्र त्यांना विसरताही येत नाही. असंच एक नाव म्हणजे अब्दुल कादिर खान. पाकिस्तानचे दिग्गज फिरकीपटू असलेल्या अब्दुल कादिर यांनी कारकि‍र्दीत अनेकदा अविस्मरणीय गोलंदाजी केली. त्यामुळे त्यांचे नाव पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात सन्मानाने घेतले जाते.

१५ सप्टेंबर १९५५ रोजी लाहोर येथे जन्मलेल्या अब्दुल कादिर यांनी १९७७ मध्ये इंग्लंडविरुद्ध लोहोरला झालेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. ज्या काळात वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व होतं. त्याकाळात अब्दुल कादिर यांनी आपल्या फिरकी गोलंदाजी भल्याभल्या फलंदाजांना नाचवलं.

तरी परदेशात किती फिरकी गोलंदाजी चालणार, असं म्हणून एखाद्या कर्णधाराने त्यांना संधी दिली नसती.

मात्र इम्रान खान यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी अब्दुल कादिर यांना १९८२ साली इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी फ्रेंच बिअर्ड ठेवायला आणि एक लहेजा पकडायला सांगितला. त्याचा अब्दुल कादिर यांना फायदा झाला. त्यांनी स्विंगला साथ देणाऱ्या इंग्लंडच्या धरतीवर ३ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या.

Abdul Qadir Khan
T20 World Cup 2007 Video: पहिल्याच सामन्यात दिसली होती थालाची चाणक्यनीती, पाकिस्तानचा बॉल आऊटमध्ये झालेला पोपट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com