Indian cricketers including Sehwag salute Indian Army
भारतीय लष्कराने ७ मे २०२५ च्या मध्यरात्री ‘Operation Sindoor’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले. पहलगाल हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त कारवाईत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवले गेले, ज्यामुळे दहशतवादी संघटनांना मोठा फटका बसला. भारताने ही कारवाई मर्यादित आणि गैर-संघर्षवर्धक असल्याचे सांगितले, तसेच पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य न केल्याचे स्पष्ट केले.