
भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानला दिले. भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या मोहिमेला भारतीय लष्कराने "ऑपरेशन सिंदूर" असे नाव दिले. रात्री २ वाजता लष्कराने बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाघ, कोटली, सियालकोट आणि मुजफ्फराबाद ही ठिकाणं होती, जिथं अचूक हवाई हल्ले केले. भारतीय सैन्याच्या धाडसी कारवाईनंतर आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी India vs Pakistan यांच्यात क्रिकेट सामनेच नको, अशी स्पष्ट भूमिका भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याने घेतली आहे.