

MS Dhoni ODI Record
esakal
MS Dhoni ODI Record : भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, आजही त्याचे काही विक्रम कायम आहेत. त्यापैकी एक विक्रम गेल्या २१ वर्षांपासून कायम आहे.
२००५ मध्ये आजच्याच दिवशी धोनीने श्रीलंकेविरुद्ध जयपूरमध्ये वनडे कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी केली होती. या सामन्यात २९९ धावांचा पाठलाग करताना धोनीने १४५ चेंडूंमध्ये नाबाद १८३ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने १५ चौकार आणि १० षटकार मारले होते.