DPL 2026 umpire hit by straight drive viral video
esakal
DPL 2026 scary moment umpire gets hit by cricket ball: न्यू दिल्ली टायगर्सचा फलंदाज लक्ष्य थरेजा याने मारलेला जोरदार फटका सरळ समोर उभ्या असलेल्या अम्पायरला लागला अन् क्षणभर सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. दिल्ली प्रीमिअर लीगमधील इस्ट दिल्ली रायडर्सविरुद्धच्या सामन्यात हा क्षण पाहायला मिळाला. चेंडू एवढ्या जोरात अम्पायरच्या गालावर आदळला की तातडीने वैद्यकीय मदत बोलवावी लागली. १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टायगर्सच्या डावातील १८ व्या षटकात हा प्रसंग घडला.