Why Oval Invincibles are renamed MI London: मुंबई इंडियन्स ही इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. रिलायन्सची मालकी हक्क असलेल्या या फ्रँचायझीने जगभरातील विविध व्यावसायिक लीग्समध्ये गुंतवणूक केली आहे आणि आता ही फ्रँचायझी इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. येथे सुरू असलेल्या द हंड्रेड लीगमधील ओव्हल इन्विन्सिबल्स संघात त्यांनी गुंतवणूक केली आहे आणि आता पुढील पर्वात हा संघ MI London या नव्या नावाने मैदानावर उतरणार आहे. Telegraph ने हे वृत्त दिले आहे.